रत्नागिरी : पत्रकार वारिसे यांच्या मृत्यूनंतर रिफायनरी विरोधकांकडून, पत्रकारांकडून आणि सामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रया देण्यात येत आहेत.. तळकोकणतील ‘रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे याच्या संतापाचा परखड भाषेतील एक विडिओ पण बराच व्हायरल होत आहे.
‘रानमाणूस’ म्हणतो >>>>>>>>>
तो मेला नाही! तो मारला गेला आहे! रिफायनरी विरोधी गावकर्यांचा आवाज बनलेल्या शशिकांत वारिसे या निर्भीड, सच्च्या पत्रकाराचा दिवसाढवळ्या खून झाला. माझं शांत, संयमी, सुखी आणि समाधानी कोंकण आता तसे राहिले नाही. देवाला, देवचाराला सत्याच्या रुपाला घाबरणारे लोक आता बदलेले आहेत. रानपाखरांसारखे जगण्याचे स्वातंत्र्य भोगणारे लोक आता घाबरून जगात आहेत कारण उकिरड्यावरची गिधाडे आता आमचा आसमंत बळकावू पाहत आहेत. आज वारिसे गेला, उद्या गावडे जाईल तर परवा परब.
(संबंधित बातमी>खळबळजनक: वारिसे हत्येतील मुख्य आरोपीच्या जमीन मालकीच्या कागदपत्रात अग्रगण्य प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांची नावे)
तुम्ही लाईक, शेयर आणि कंमेंट करून मोकळे व्हा. विरोध करू नका आणि व्यक्त होऊ नका कारण इथल्या राखणदारालाही मारून टाकणारी नरभक्षकी जमात मोकाट फिरते आहे.
सत्ता,संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हंटला तर डोकं फोडतील…….
हलकट, लाचारांचा देश म्हंटला तर रस्त्यावर झोडतील……..
खरीदले जाणाऱ्यांच्या देश म्हंटला तर वाट रोखतील……..
देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोलले तर नाक्यावर गाठून ठोकतील……..
शोषण करणाऱ्यांचा देश म्हंटला तर नोकरीवरून कडून टाकतील…….
म्हणून माझ्या प्यारे भाईयों और बेहेनों, माझ्याकडून या नपुसंकत्वाला सलाम……
सबको सलाम ……….
सबको सलाम……….
Vision Abroad