मुंबई : लोकमान्य टिळक स्टेशन येथील ७ नंबरच्या रेल्वे वॉशिंग पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी मध्यरेल्वे एक ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ दरम्यान ३५ दिवसांसाठी असेल. या ब्लॉक मुळे कोंकणरेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या पनवेल पर्यंत चालविण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
16346 – तिरुअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावर संपेल.
16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१२:४५) सुरू होईल.
12620 – मंगळूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ पनवेल स्थानकावर संपेल.
12619 –लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१६:२२) सुरू होईल.
(हेही वाचा >शिगमोत्सवासाठी कोंकणरेल्वेची चेअर कार विशेष गाडी…आरक्षण १४ फेब्रुवारी पासून सुरु…)