सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यात आज फिल्मी स्टायल ने चोरी करण्यात आली. बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याला लुबाडल्याची घटना आज बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत घडली. दोन महिलांनी तब्बल ५६ हजार रूपये हातोहात लंपास केले.
नक्की काय घडले ?
नगरपंचायतीचे कर्मचारी संजय राणे हे दुपारी बाराच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी बँकेमध्ये दाेन महिला घुटमळत होता. बँकेत पैसे भरत असताना या महिला राणे यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्यानंतर कॅश काऊंटरवर व्यवहार होत असताना यातील एका महिलेने राणे यांच्या बॅकेत हात घालून आतील ५६ हजार रूपयांची रोकड .लांबवली यानंतर लागलीच या महिला पसार झाल्या. राणे यांच्याकडे सुमारे २ लाख ५६ हजार रूपयांची रोकड होती. बँकेत पैसे भरताना यातील ५६ हजार रूपये गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी gबँकेकडील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली.यावेळी त्या महिलांनी ही रक्कम लांबविल्याचे लक्षात आले. यानंतर नगरपंचायत अधिकाऱ्यांनी बँकेत धाव घेतली होती. तसेच त्या महिलांचाही शोध कणकवली पोलीसांनी सुरू केला आहे.
बॅग मधील दोन बंडल ५६ हजार ४१० रुपये काढत धाडसी चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी भा. द. वी. कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. महिला चोरी करताना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad