सिंधुदुर्ग | देवगड तालुक्यातील बापर्डे रेडेटाका येथे एक मोठे विलक्षण मानवाकृती कातळशिल्प सापडले आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील इतर कातळचित्राचा अभ्यास करण्यासाठी कातळशिल्पे अभ्यासकांना दाखवण्यासाठी रणजित हिर्लेकर व अजित टाककर हे या भागात गेले असता त्यांना श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बागेत हे कातळशिल्प सापडले आहे.
या सापडलेल्या कातळशिल्पाची वैशिष्ट्ये
रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्या माहितीनुसार…
- कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे आहे.
- मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
- जवळपास विस ते पंचविस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे.
- यातील मानवाकृती कातळचित्र हे आता पर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे.
- जवळपास पंधरा ते सहा फुट रुंदीच्या आयाताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल अशी ही मानवाकृती आहे.
- आतापर्यंत देवगड तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे.
- ही संपुर्ण फेम विविध प्रकारे सजवली नटवली आहे.
- पहाताक्षणी मानवी मनाला धक्का बसेल व ही भव्याकृती पाहुन तो त्यापुढे नम्र होईल, इतकी विलक्षण मोठी ही आकृती आहे.
- आजवरच्या कातळचित्रां विषयीच्या संशोधनाला धक्का देईल, इतके वेगळेपण या आकृतीत पहायला मिळते.
- जवळ पास चाळीस ते पन्नास चौरस फुटात ही विविध कातळचित्रे कोरलेली आहेत.
- ही सर्वच कातळचित्रे आतापर्यंत दिसणाऱ्या कातळचित्रांपेक्षा वेगळी आहेत.
लगेचच या कातळचित्रांची साफसफाई व डाँक्युमेंटेशन करण्यासाठी नाईकधुरे यांच्याशी बोलुन टाककर व हिर्लेकर यांनी नव्या मोहीमेची योजना केली. सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळीच या जागी पोहोचुन त्याची साफसफाई करण्यात आली. या कामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर या देवगड काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
हेही वाचा – रत्नागिरी येथे मानवी वस्तीत आढळले खवले मांजर
देवगड इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या कातळचित्र संशोधन व संवर्धनाच्या कामा बाबत माहीती देताना श्री. अजित टाककर म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्हाला तिस ते चाळीस नविन कातळचित्रे सापडली आहेत. आता देवगड तालुक्यात सोळा- सतरा ठिकाणी साठ पासष्टहुन अधिक कातळचित्रांची नोंद आम्ही घेतली आहे. या विषयीचा रिपोर्ट व संशोधन लेख येत्या १७ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात भरणाऱ्या कोकण इतिहास परीषदेच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला जाणार आहे.
Vision Abroad