रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे. नाण्याची दुसरी बाजू अशी की विद्युतीकरणामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा आवाज येत नाही. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना नागरिकांचा किंवा प्राण्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे अपघात टाळण्यासाठी जे गाव रेल्वे ट्रॅकच्या लगत आहेत अशा गावांना रेल्वे प्रशानाने जाळी बसवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
या आधी गाड्या डिजेल इंजनवर चालायच्या. त्यामुळे त्याचा आवाज मोठा असायचा पण आता आवाज कमी येतो. रेल्वे चालक हॉर्न वाजवतात पण त्यावर पण काही मर्यादा येतात. रेल्वे पटरीवरून जाते वेळी व येते वेळी विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा आवाज येत नसल्यामुळे नागरिक व गुरा घोरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad