मुंबई | वरील फोटो गुजराथ मधील नसून मुंबई मधील एका रेल्वे स्थानकाच्या लिफ्ट मधील आहे . एकीकडे मुंबईमध्ये मराठी टक्का कमी होत असताना आता इथे मराठी भाषा पण हद्दपार करण्याचे असे धक्कायदायक प्रकार घडताना दिसत आहेत. कांदिवली रेल्वे स्थानकाच्या एका लिफ्ट मध्ये सूचना पाटीवर मराठी भाषेच्या जागी चक्क गुजराथी भाषा वापरली गेली आहे.
ही सूचना अनुक्रमे गुजराथी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये छापून चिटकवली गेली आहे. या सूचनेमध्ये मराठी भाषेला अजिबात स्थान देण्यात आले नाही. कांदिवली स्थानकाच्या बोरिवली दिशेने असणाऱ्या लिफ्ट मध्ये ही सूचना लावण्यात आली आहे.
मुंबईकरांच्या बोलण्यातून तडीपार होणारी मराठी भाषा आता सरकारी सूचना, माहितीपत्रके आणि इतर माध्यमातून तडीपार होताना दिसणे हे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला धक्कादायक असे आहे.
Facebook Comments Box