Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्यात येत आहेत. पण या बदलामुळे रेल्वे समोर काही नव्या समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातील एक समस्या म्हणजे या मार्गावरील माकडांपासून होणारा त्रास.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील OHE पोर्टल्स तसेच मास्ट्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वे गाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.
कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतांची बागेंची नासधूस करून या माकडांनी शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. आता त्यांचा त्रास कोकण रेल्वे मार्गावर होताना दिसत आहे. आता यावर उपाय म्हणून या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत. त्यासाठी रेल्वेतर्फे निविदा देखिल काढण्यात आली आहेत. सुमारे 6 लाख 62 हजार 663 रुपये इतक्या अंदाजीत खर्चाची ही निविदा आहे