रत्नागिरी |आपल्या जन्मभूमीच्या विकासात आपण काही हातभार लावावा अशी प्रत्येक चाकरमान्यांची मनापासून इच्छा असते पण अनेक कारणांमुळे त्यांना सहभागी होता येत नाही. पण रत्नागिरीतील निवळी गावाच्या ग्रामपंचायतीने अशा चाकरमान्यांसाठी ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’ हा उपक्रम चालू करून इतर गावांना एक नव आदर्श घालून दिला आहे.
निवळी गावचे सरपंच दैवत पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.ते म्हणाले कि गावातून शिक्षण घेऊन मुंबई, पुणे आणि इतर शहरात गेलेल्या तरुण-तरुणींनी गावच्या विकासाबाबत त्यांचे व्हिजन , नवीन संकल्पना मांडता याव्यात आणि त्यांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधता यावा यासाठी ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार आहे. आपल्याला या सूचना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिल्या होत्या त्यावर विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. ही सभा सुरवातीला वर्षातून एकदा म्हणजे गणेशोत्सवाच्या सुट्टीत किंवा मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे.
सुशिक्षित तरुण-तरुणी रोजगारासाठी शहरात जाण्याचे प्रमाण कोकणातील गावात जास्त आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीचा, आधुनिक विचारसरणीचा आणि शिक्षणाचा फायदा घेऊन गावाचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. असे उपक्रम प्रत्येक गावात राबविल्यास कोकणचा सर्वांगीण विकास होईल.
Facebook Comments Box
Vision Abroad