सिंधुदुर्ग – गोवा ही देशाची पर्यटन राजधानी मानली जाते. परंतु गोव्याच्या पर्यटनाला आता एका नवीन चिंतेने ग्रासले आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्टीने पाहता गोवा राज्याची ही चिंता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनास नवा हुरूप देणारी ठरणार आहे.
गोव्यातील समुद्रकिनारे आणि किनाऱ्यांवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. तथापि, गोव्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर महाराष्ट्रातील मालवणचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, अशी चिंता पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली. गोवा विधानसभा अधिवेशनात ते बोलत होते.
मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्यताील वॉटरस्पोर्ट्समध्ये दलालच बहुतांश वाटा घेऊन जातात आणि खुद्द वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटर्सना मात्र कमी पैसे मिळत आहेत. जर यावर नियमन असणारी यंत्रणा लवकरात लवकर आणली नाही तर हा प्रश्च चिघळेल. पर्यटन क्षेत्रासमोर गंभीर समस्या उभी राहिल. शेजारीच महाराष्ट्रातील मालवण येथे वॉटरस्पोर्ट्स आहेत. ते राज्यातील वॉटरस्पोर्ट्ससमोर मोठे आव्हान आहे, असे खंवटे म्हणाले.
हेही वाचा – मुंबई ते गोवा रेल्वेने प्रवास करताय? कोकण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त रेल्वेचा ‘हा’ पर्याय सुद्धा जाणून घ्या…
पर्यटन मंत्री यांची चिंता रास्त आहे. गोवा राज्यात पर्यटन क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्र वेगळे आहे आणि समुद्र किनाऱ्यावर गर्दी कमी असते, तसेच गोव्यात जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यातील जवळ जवळ सर्व प्रकार ईथे अनुभवता येत आहेत. त्यामुळे एक स्वस्त पर्याय म्हणुन पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनार्यांना प्राधान्य देताना दिसत आहे.
<h3>Related posts:</h3>
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन विकसित होत आहे कि नाही या प्रश्नाचे उत्तर काहीही असो, गोवा राज्याच्या पर्यटन उद्योगाने येथील पर्यटनाच्या विकासाची धास्ती घेतली हे नक्की.
Vision Abroad
Vision Abroad