Goa To Gujrat Railway: गोव्यातून मुंबई,पुण्यात तसेच गुजराथ राज्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. वास्को ते ओखा साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ऐन सुट्टीच्या हंगामात 28 मार्चपासून धावणार आहे. त्यामुळे गोव्यातून थेट मुंबई आणि गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गे न धावता मडगाव, बेळगाव मार्गे पुणे येथून कल्याण ते वसई या मार्गाने धावणार आहे.
वास्को-ओखा विशेष एक्स्प्रेस ओखा येथून 28 मार्च रोजी रात्री 9 वाजता निघेल व 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता वास्को येथे पोहोचेल. वास्को-ओखा एक्स्प्रेस 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल.
ही गाडी ओखा ते वास्को 28 मार्च, 04, 11, 18, 25 एप्रिल, मे महिन्यातील 02, 09, 16, 23, 30 आणि जूनमधील 06, 13, 20, 27 या तारखांना धावेल. ही गाडी एकूण 14 फेऱ्या करणार आहे.
वास्को ते ओखा 30 मार्च, त्यांतर 06, 13, 20, 27 एप्रिल, त्यानंतर मे मधील 04, 11, 18, 25 आणि जूनमधील 01, 08, 15, 22, 29 या तारखांना धावेल, एकूण 14 फेऱ्या करेल.
ही एक्स्प्रेस मडगाव, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, कामन रोड, वसई रोड, वापी, सुरत, भरुच, बडोदा, नादीद, अहमदाबाद, राजकोट, द्वारका या स्थानकावर थांबेल.
ओखा-वास्को एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक बुधवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी येईल व वास्को-ओखा एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक गुरुवारी रात्री 10 वाजता येईल.

Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Facebook Comments Box