पालघर : वसई – विरार भागातील कोकणवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील कित्येक गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खासदार श्री. गावित यांनी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.
बोरिवली ते विरार या पट्ट्यात कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्या वसईमार्गे जातात. पण या गाड्या नियमित नाही आहेत. तसेच या गाड्या कोकणातील काही मोजकेच थांबे घेतात.शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दादर या स्थानकावर यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच पण खूप त्रास सहन करावा लागत आहे.
वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे.
Vision Abroad