रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील फलक आणि मैलाच्या दगडांवर कोकणातील शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहली जात असल्याने मराठी भाषा प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या फलकांवर चिपळूणचे ‘चिपलून” व पेणचे ‘पेन” असे -लिहिल्याने मराठीची शुद्धता लोप पावली असल्यासारखे वाटत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील फलक तयार करणारी टीम ही हिंदी भाषिक असल्याने असल्याने शहर व ठिकाणांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख होत आहे. अशी मराठीची मोडतोड ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबई-पुण्यामध्ये हिंदी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे. हिंदी भाषिक येथील शहरांची नावाचा चुकीच्या पद्धतिने उच्चार करताना सर्रास दिसतात.उदाहरण द्यायचं झाले तर पुण्याचे ‘पुना’ तर ठाण्याचे ‘थाना’ हे चुकीचे उच्चार होतात. तोच प्रकार आता कोकणात निदर्शनास येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad