मुंबई – आजकाल समाज माध्यमांतून अफवा पसरवणे हे नेहमीचे झाले आहे. काही लोक फक्त मजा किंवा निव्वळ टाईमपास म्हणुन काही पोस्ट बनवून त्या सोशल मीडिया वर पसरवत असतात. या अफवांवर विश्वास ठेवून समाजातील इतर घटकांचे खूप नुकसान होते.
मागे एकदा बारावीची परीक्षा देणारे काही विद्यार्थी एका पेपरला परीक्षा केंद्रात हजेर राहू शकले नाहीत. कारण कोणीतरी परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक व्हायरल केले होते. त्या वेळापत्रकावर
विश्वास ठेवल्याने त्यांचा पेपर हुकला आणि नुकसान झाले. असाच प्रकार आता मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणार्या T.Y. B.A या परीक्षेच्या बाबतीत घडला आहे. उद्या होणारी परीक्षा पुढच्या कोणत्या तरी तारखेला होणार आहे अशा आशयाचे मेसेज सोशल मीडिया वर पसरविण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या हे लक्षात येताच त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून ते प्रसिद्ध केले आहे.T.Y. B.A (Semester VI) ची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रका प्रमाणेच होणार असून सोशल मीडिया वरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
Vision Abroad