सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक विस्टाडोम कोच

Konkan Railway News: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.
कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. या बदलानंतरतेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.
मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.
व्हिस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, विद्युतीयरित्या चालणारे स्वयंचलित स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे, विशेष दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे आणि सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली शौचालये हि वैशिष्ट्ये आहेत. तीन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली व्ह्यूइंग गॅलरी हे या डब्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे, रेल्वे अधिकार्‍यांच्या मते, आणि प्रवाशांना त्यातून छायाचित्रे आणि सेल्फी काढणे आवडते.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search