सिंधुदुर्ग | सावंतवाडी तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमानी गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. मागेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस चा दर्जा पण देण्यात आला आहे. मात्र येथील प्रवाशांना रेल्वेच्या आरक्षणासंबंधी एक समस्या नेहमीच भेडसावत आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक ते सावंतवाडी शहर हे अंतर जवळपास ८ किलोमीटर आहे.आरक्षण करण्यासाठी यायचे म्हंटले तर प्रवाशांच्या वेळेचा, श्रमाचा आणि पैशाचा अपव्यव होतो. त्यामुळे सावंतवाडी पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे टिकेट्स आरक्षणाची सुविधा चालू करावी अशी मागणी होत आहे.
कुडाळ, कणकवली रेल्वे स्थानके त्या त्या शहरांच्या जवळ असल्याने तेथील प्रवाशांना हा त्रास कमी प्रमाणात होतो पण सावंतवाडीतील प्रवाशांना या त्रासाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट वर आरक्षण करताना अनेक अडचणी येतात. इंटरनेट वर रेल्वे तिकीट आरक्षित करता येते पण तिकीट प्रतीक्षा यादीत राहिल्यास ते रद्द होते या नियमामुळे प्रवाशांना आणीबाणीच्या Emergency वेळी तिकीट खिडकीवर येऊन आरक्षित टिकेट्स मिळवावे लागते.
आमच्या प्रतिनिधींनी याबाबत अधिक चौकशी केली असता यापूर्वी सावंतवाडी शहर येथील पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे टिकेट्स आरक्षणाची सुविधा होती; पण कोरोना लॉकडाउन नंतर ही सुविधा बंद करण्यात आली त्यानंतर ही सुविधा पुन्हा सुरु झाली नाही अशी माहिती मिळाली. मात्र ही सुविधा पुन्हा चालू करावी अशी मागणी होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad