रत्नागिरी | दि.२० एप्रिल २०२३ |मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम विना अडथळा आणि जलद गतीने करता यावे यासाठी कंत्राटदार कंपनीने हा घाट वाहतुकीस बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीची सरकारकडून दखल घेतली गेली आहे.
या घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परशुराम घाट बंद असला तरी या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे.तसेच डोंगर कटाई करताना मोठे दगड रस्त्यावर येऊन अपधात होऊ नये या साठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाट अत्यंत अवघड टप्पा आहे. वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी होत्या त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला होता. अखेर जिल्हाधिकारी यांनी घाट सादर कालावधीत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Vision Abroad
Vision Abroad