सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू आणि खनिज वाहतूकीवर वेळेची मर्यादा.

सिंधुदुर्ग – जिल्‍ह्यातील व जिल्‍ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून चालकांनी आज २१ एप्रिलपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी काल के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

जिल्‍हयातील वाळू/रेती व अन्‍य गौण खनिजाच्‍या वाहतुकीवेळी झालेल्‍या अपघातांमुळे काही ना‍गरिकांना आपला जीव गमवावा लागला. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या अध्‍यक्षतेखाली गौण खनिजाच्‍या अवैध उत्‍खनन व वाहतुकीवर आळा घालण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत या वाहतुकीवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्‍य सचिव जिल्‍हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.

बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्‍त कारवाई करण्‍याच्‍या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search