बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण सोमवारपासून; परिसरात शासनाचा जमावबंदी आदेश लागू

रत्नागिरी – कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवारपासून केली जाणार आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत.
सोमवारी २४ एप्रिल म्हणजे उद्यापासून हे ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटरच्या परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
 ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग’ विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवित आहेत. याबाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरुपाची आंदोलने केली आहेत. तसेच इतर भागांतूनही आंदोलक अशा आंदोलनात सहभागी होत असतात, अशी टिप्पणी या आदेशात करण्यात आली आहे.बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन योग्य आहे किंवा कसे? याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळच्या कालावधीत ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन लोकांचे नेतृत्व करणे, दंगल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, चिथावणी देणे, समान उद्देशासाठी बेकायदेशीर जमाव जमवून त्यात सामील होणे, इच्छा पूर्वक दुखापत पोहोचविणे, नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आवेग करणे, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे, असे गुन्हे घडलेले आहेत, असे स्पष्टपणे नमूद करत प्रशासनाचा मागील अनुभव लक्षात घेऊन हे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

1 thoughts on “बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण सोमवारपासून; परिसरात शासनाचा जमावबंदी आदेश लागू

  1. Sanjay rane says:

    भौगोलिक परिसराचा अभ्यास करून तिथे प्रकल्प राबवा. कोकणात रिफायनरी नको,कारण तिथे जो निसर्ग आहे त्याला तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय . बरं तेथील लोकांचा विरोध असताना तुम्ही तो पकल्प राबवता. लोकांची ऐच्छा काय आहे की तुम्ही तिथे रस्ते धरणे बांधा लोकं शेती करतील आणि त्यांची ई छा काय आम्ही खुश आहोत तिथे, त्यांना जे हव आहे ते त्यांना तुम्ही देत नाहीत जे नको ते त्यांचा माथी लाद ताय कशाला, जे मागतात ते तुम्ही देत नाही जे नको ते तुम्ही त्यांना देताय. ( ज्यादा की हमको नही लालच थोडे मैं गुजारा होता है हम इस कोकण के वासी है जहा तांदूळ आंबा काजू नाचणे होते है) भिक नको पण कुत्रा आवर बाबा . कोकणातले सरपंच,आमदार,खासदार त्यांचा काय अभ्यास त्यांना ही समजत नाही,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search