मुंबई – मुंबई ते कोकण हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकण प्रवास अधिक गतीमान होणार आहे.
ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील प्रकल्प आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा मार्ग जोडतो. त्याचा बहुतांश लाभ मुंबईकरांना होणार असला तरी या मार्गामुळे मुंबई स्थित कोकणवासीयांचा फायदा होणार आहे.
हा सागरी पूल पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडतो. त्यामुळे मुंबईकरांना कोकणात जाणे सोपे होणार आहे. सध्या मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो, ट्रॅफिक जामची पण मोठी समस्या आहे.
मात्र या सागरी मार्गामुळे 25 मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकणातील आपल्या गावचा प्रवासातही जवळपास दोन तास वाचणार आहेत.


Vision Abroad
