सिंधुदुर्ग | वेंगुर्ला बंदरावर बनलेला कोकणातील पहिला झुलता पूल Sea Link पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पर्यटक आणि स्थानिक सुद्धा फोटोशूट, सेल्फीशूट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे भेटी देत आहेत. या पुलामुळे वेंगुर्ले तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. मात्र रात्री हा नयनरम्य पूल काळोखात दिसत नाही त्यामुळे त्यावर विद्युत रोषणाई करण्याची मागणी होत आहे.
या झुलत्या पूलावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच शहरातील आंतर्रिक रस्त्यांची सुधारणा करण्याबाबत मनिष सातार्डेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदला निवेदन दिले आहे. हे निवेदन कार्यालय अधीक्षक संगीता कुबल यांनी स्वीकारले आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झुलता पूलामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनात भर पडत आहे. परंतु, या पुलावर विद्युत रोषणाई नसल्याने रात्रीच्यावेळी हा झुलता पुल काळोखात असल्याने या पुलाचे सौंदर्य रात्रीच्यावेळी पर्यटकांना पाहता येत नाही. त्यामुळे या पुलावर लवकरात लवकर विद्युत रोषणाई करावी. तसेच शहरातील आंतर्रिक रस्त्यांची दुरावस्था झालेली असून हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्याची डागडुजी करावी असे नमुद केले आहे.
इतर शहरात झुलते पूल पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. त्या पुलांवर आकर्षक रोषणाई करून मनमोहक दृश्य निर्मण केले जाते. त्यामुळे त्या त्या शहरांच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्याच धर्तीवर वेंगुल्रे येथील पुलावर तशी आकर्षक रोषणाई करावी अशी मागणी होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad