चिपळूण – माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार असे म्हणत एका प्रकल्पग्रस्त शेतकर्यांने मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे चक्क लोळण घातली आणि महामार्ग अर्धा तास अडविला. भर उन्हात काल सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.
चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला.
Vision Abroad