रत्नागिरी शहरात होणार परप्रांतीय फेरीवाल्यांचा सर्व्हे

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी |  रत्नागिरी शहरात परप्रांतीय फेरीवाले आणि स्थानिकांत होणारे वाद वाढत चालले आहेत. या वादांनी गंभीर स्वरुप घेऊ नये यासाठी शहरातील परप्रांतीय फेरीवाल्यांचा प्रशासनातर्फे आता सर्व्हे केला जाणार आहे. शहरातील फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटनेमध्ये सुरू असलेली धुसफूस वाढवण्यापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वातावरण थंड करण्यासाठी  सर्व्हे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व्हे झाल्यावर आवश्यक ती माहिती हाती येईल आणि फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटना यांच्यामध्ये समन्व्य साधता येईल असे ते म्हणाले. दरम्यान, पुढील निर्णय होईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नका अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शहरातील रामआळीमध्ये बसणाऱ्‍या फेरीवाल्यांच्या म्होरक्याकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार शहर व्यापारी संघटनेने पोलिस ठाण्यात दिली होती. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे अशी मागणी नगर पालिका व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे नगर पालिकेने फेरीवाले हटाव मोहीम राबवण्याचे जाहीर केले. यातून फेरीवाले विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा राहण्याचे चित्र निर्माण झाले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रत्नागिरी दौऱ्‍यात शहर व्यापारी संघटना व फेरीवाले यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीत जोरदार खडाजंगीही झाली. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे व त्यांना अन्यत्र जागा द्यावी अशी प्रमुख मागणी व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे फेरीवाले व्यावसायिक व लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. अनेक फेरीवाले हे मतदार असून अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत, त्यामुळे त्यांना हटवू देणार नाही असा पवित्रा माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी घेतला. या वेळी विजय खेडेकर, किशोर मोरे, स्मितल पावसकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका मांडली. मात्र सामंत यांनी फेरीवाले व व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांची समजूत घातली.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search