मुंबई – मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याच त्यांनी यावेळी जाहीर केले.
यासंर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर वर मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती आपण एका पत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती अशा आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली आहे. याशिवाय आजून दोन मोठ्या प्रकल्पास महापुरुषांची नवे देण्यात यावी अशीही या पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.
१) वांद्रे वर्सोवा सी लिंक ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे
२) मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे.
Facebook Comments Box
Vision Abroad