Konkan Railway News |गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे. परंतु रेल्वे गाड्यांचे आरक्षण अगदी काही मिनिटात फुल्ल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या पदरात निराशा पडत आहे. तर काही प्रवासी प्रतीक्षा यादीत तिकीट काढत आहेत; त्यामुळे प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० च्या घरात गेली आहे. तर काही गाड्यांची वेटिंग लिस्ट पण बंद होऊन Regret स्थिती दाखवत आहे.
कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस, मंगुळुरु एक्सप्रेस या गाड्यांच्या १५ सप्टेंबरची स्लीपर श्रेणीची कणकवली पर्यंतची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे. तर तुतारी, जनशताब्दी, एलटीटी-मडगाव या गाड्यांची आरक्षण प्रतीक्षा यादी २०० च्या वर गेली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे.
Vision Abroad