सिंधुदुर्ग – दिनांक १५ मे सोमवारी एका मोठ्या उद्योगपतीने दोडामार्ग तालुक्यातील शिरवल या भागास भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केल्याने अनेक चर्चांना ऊत आले आहे. या उद्योगपती नाव समजले नसले तरी तो एक दिल्लीतील मोठा उद्योगपती असलयाचे समजते. सुमारे १० ते १२ गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर होता, तसेच स्थानिक प्रशासनाने त्याला या दौऱ्यासाठी सुरक्षा दिल्याचे समजते. पण याबाबत कोणतीही बातमी किंवा माहिती प्रशासनतर्फे प्रसिद्धीसाठी दिली नाही आहे, त्यामुळे जनतेला अंधारात ठेवून काहीतरी शिजवले जात आहे असे तर्क लावण्यात येत आहेत.
तळकोकणातील दोडामार्ग तालुका गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. अलीकडेच गोवा – महाराष्ट्र सीमेवर नवीन विमानतळ झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जमिनींवर भूमाफियांची, परप्रांतीयांची वक्रदृष्टी पडली आहे. अलीकडेच या तालुकयातील काही जमिनीबाबत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्ववभूमीवर जमिनीचे अनेक गैरव्यवहार झाले होते. तसाच प्रकार येथे होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे .मोठ्या उद्योगपतींनी पण येथे रस दाखविला असल्याने येथे पण एक प्रकल्प येईल का असे तर्क लावले जात आहेत.
![]()
Facebook Comments Box






Konkan ,Goa,Karnatak passengers demand a new Vande Bharat Sleeper train to start from Dadar West,Prabhadevi via Bhayander & Panvel to run overnight upto Mettupalaium-MTY.