Konkan Railway News | यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी रेल्वे आरक्षण चालू झाले आहे. या मार्गावरील नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटात फुल्ल होऊन जवळ जवळ सर्वच गाड्यांच्या सर्वच श्रेणीचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे. आज तर १६ सप्टेंबर चे आरक्षण फक्त एक मिनिटात रिग्रेट दाखवत होते,त्यामुळे दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे.
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
दलाल आरक्षित तिकिटे कशी मिळवतात?
१) काही दलाल तिकीट विंडो समोर रात्रभर आपली माणसे उभी करून हंगामाच्या काळातील गाड्यांची तिकिटे काढतात.
२) दलाल आता आधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून गैर मार्गाने ऑनलाईन तिकिटे मिळवतात. यासाठी ते जलदरित्या तिकीट बुकिंगसाठी काही सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक ती माहिती अगोदरच भरून काही क्षणात तिकीट आरक्षित करता येते.
३) दलाल काही रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने काळा बाजार करीत असल्याचा संशय आहे.
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad