वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा मिळणे गरजेचे…

सिंधुदुर्ग | शाम जोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.

कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत. 

अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे. 

सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्‍या पर्यटकांना होणार आहे. 

 

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

12 thoughts on “वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा मिळणे गरजेचे…

  1. हरिष says:

    वंदेमातरम ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही स्टेशनला स्टाॅप असावा.

    • Sheela dewoolkar says:

      Vande bharat express, Tejas express, Humsafar express, gatiman express,ac shatabdya, janshatabdya , sampark kranti express, sapat kranti express,Goa sampark kranti express,goa express, Uday express, double decker express, garib rath express,yuva express,ac express,rajdhanya,douranto traines stopping station – central railway – m.c.s.t., dadar,Thane,mangaon, khad, sangmeshwar, sindhudurg, sawantwadi,thivim, madgaon. Western railway – charchgeat, m.c. , bandra, adh , borivali, mangaon,khed, sangmeshwar, sindhudurg, sawantwadi, thivim, madgaon stopping train halts dya.

  2. विजय शिवराम परब says:

    हो, वंदे भारत एक्सप्रेस ला सावंतवाडी येथे थांबा दिलाच पाहिजे. कारण हे स्टेशन महाराष्ट्र राज्यातील शेवटचे स्टेशन तर आहेच शिवाय आंबोली,दोडामार्ग,बांदा, वेंगुर्ला,सावंतवाडी बाजारपेठ, मुंबई गोवा महामार्गामुळे गॊवा ला पण लवकर पोहोचता येते. आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

    • Sheela dewoolkar says:

      12779-12780 goa express ,12133-12134 Mumbai -manglore express,22907-22908 hapa- madgaon express,12217-12218 k.c.sampark kranti express, 12249-12250 goa sampark kranti express ya gaadyana 22119-22120 Tejas express ya gaadyana dadar, sawantwadi, thivim stopping dya

  3. Sanket Labde says:

    सुपरफास्ट श्रेणीमधील
    नवी दिल्ली – तिरूअनंतपुरम सावंतवाडीला थांबते
    नवी दिल्ली – मडगाव व तेजस कुडाळला थांबते
    जनशताब्दी कणकवली-कुडाळ-सावंतवाडीला थांबते मग वंदे भारत कणकवलीला थांबलीच पाहीजे.

    • Sheela dewoolkar says:

      Cstm -ers duronto express vs dadar -ers duronto express sleeper, second setting vs second class. C.s.t.m. – sawantwadi road duronto express full ac vs hafe ac vs non ac . Dadar -sawantwadi road duronto express full ac vs hafe ac vs non ac traines chalu kara.11085-11086 CST – madgaon double decker express 11099-11100 dadar – madgaon double decker express 22115-22116 LTT – madgaon ac express ,22475-22476 hisar- coimbatore ac express ya gaadyana sawantwadi road vs thivim madhe stopping dya.01165-01166 cstm- sawantwadi road double decker express , 01167-01168 dadar – sawantwadi road double decker express vs Uday express pan suru Kara.

  4. रविंद्र शिर्के says:

    वंदेभारतचे थांबे हे कोकणकण्या एक्सप्रेस प्रमाणे सर्व सद्य स्टेशनला द्यावेत. व हीसेवा कोकणवाशियांना उपयुक्त व्हावी ही कोकण रेल्वे व्यवस्थापणास विनंती. कळावे.🙏🏻धन्यवाद!

  5. महेंद्र कृष्णा मळगांवकर says:

    वंदे भारत या रेल्वेस सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे थांबा देणे अत्यावश्यक आहे. याचे कारण सावंतवाडी शहर, वेंगुर्ले, शिरोडा, रेडी, बांदा, आंबोली येथील नागरिक सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथून प्रवास करीत असतात. विशेष म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचे स्टेशन असून तेथे टर्मिनल होणे प्रस्तावित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search