सिंधुदुर्ग : आंबोलीच्या नागिरकांमध्ये चिंता निर्माण होईल अशी एक बातमी आहे. आंबोली परिसरात गेली काही वर्षे ये-जा करणार्या महाकाय टस्करने आपला मोर्चा पुन्हा आंबोलीकडे वळवला आहे. शुकवारी तो आजरा येथे दिसला होता . येत्या 2 ते 4 दिवसांत हा टस्कर आंबोली परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे.
हा टस्कर अचानक रस्त्यावर येत असल्याने काही वेळा येथील वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. या टस्कर ने आंबोलीतील लोकवस्तीत शिरून तेथे हैदोस मांडला होता. दिवसा जंगलात राहून तो रात्री लोकवस्तीत धुडगूस घालतो. त्यामुळे त्याच्या येण्याने आंबोलीच्या जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारवाईच्या नावाखाली सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूर जिल्हा हद्दीत हुसकावून लावत आहेत. पण तिथे कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी त्याला पुन्हा आंबोली हद्दीत हुसकावतात यामुळे हा टस्कर गेली काही वर्षे सतत आंबोलीसह आजरा परिसरात ये-जा करत असतो.
Facebook Comments Box