समितीच्या चिपळूण प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी महामार्गाची सद्य दुरावस्था व्यक्तिशः मांडली.
Mumbai Goa Highway | सार्वजनिक बांधकाम मंत्रीमहोदय मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या अलीकडच्या चिपळूण भेटीत मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या चिपळूण प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदनाचे पत्र दिले. मा. मंत्री महोदयांना भेटण्यापूर्वी ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिपळूण येथील शाखा अभियंता श्री. मराठे साहेब यांची भेट घेऊन समितीच्या पत्रामधील विषयावर सविस्तर चर्चा करून विषयाचे गांभीर्य समजवून सांगितले. त्यामुळे मा. मंत्रीमहोदय हे सिंधुदुर्ग जिल्हयाचा दौरा करून चिपळूणला पोचल्यावर व्यस्त असूनही केवळ समितीच्या प्रतिनिधी ऍडव्होकेट स्मिता कदम मॅडम आणि मीडियाचे प्रतिनिधीी यांना वेळ दिला. ऍडव्होकेट स्मिता कदम यांनी मा. मंत्रीमहोदयांना थोडक्यात विषयाचे गांभीर्य सांगताना समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे महामार्गाची प्रत्यक्ष परिस्थिती समजून आली आहे . मागील १३ वर्ष महामार्गाचे कामं रखडलं आहे आणि दरवेळी नवनवीन तारखाचे वायदे मिळत आहेत व ते वायदेही पाळले जात नाहीत. ३१ मे पूर्वी एक मार्गिका उपलब्ध करण्याचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या बाबतीत कोकणी जनतेच्या भावना तीव्र होत असून कोकणातील जनता नाराज आहे. समितीच्या पत्रात व सोबत जोडलेल्या जोडपत्रात निवड्क टप्प्यातील सत्य परिस्थिती सविस्तर मांडली आहे. या बाबतीत सर्व मुद्दे चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या बरोबर आपल्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात मिटिंग लावली तर समितीचे प्रतिनिधी येऊन सविस्तर सांगतील, असे प्रतिपादन केले. ऍडव्होकेट स्मिता कदम यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देताना मा. मंत्रिमहोदयांनी महामार्गाचे काम नोव्हेंबर मध्ये पूर्ण होईल आणि गणपतीपूर्वी किमान एक मार्गिका उपलब्ध होईल असे आश्वासन दिले.
Vision Abroad