Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले आणि सुमार काम याविरोधात विविध उपक्रमातून आवाज उठवणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने जनजागृती करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर महामार्गाच्या रखडलेल्या कामा विरोधात जनजागृती करणारे घोषणा फलक लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावले गेले आहेत.
”पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावण्यात येत आहेत.झोपेचा सोंग घेऊन झोपलेल्याना आमच्या कोकणकरांच्या समस्या कळाव्यात व जास्तीत जास्त कोकणकर या आंदोलनात जोडले जावेत व स्थानिक जनतेपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वाना विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील बॅनर आपल्या विभागात फोटोसहित लावले तर एक सहकार्य मिळेल.” असे समितीचे सचिव रुपेश दर्गे म्हणाले आहेत.
या अभियानाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून जनजागृती होवून अधिक चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे दुसर्या टप्प्यात या अभियानाचे मुंबईत ठाणे व नवी मुंबई पालघर जिल्हा येथे ही नियोजन करण्याचे समितीने ठरवले आहे. जे प्रतिनिधी स्व-योगदानाने हे बॅनर आपल्या परिसरांत लावु इच्छित असतील त्यांना आपले नाव व फोटोसकट आपल्या घोषणाफलक लावु शकतात. त्यासाठी 8652505542 संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
No use of banner only way to learn them lesson is vote
Samrudi marg kasa patkan zala aapla gova road ka nahi hot yala karnibut aaple koknatil varist jababdar aahet
No one cares for Konkan people. All party and all politicians are only looting soft hearted Konkan people. It’s national shame if we cant able to construct one road in last 13 years.
Ekdacha bemudat rast roko karuya. Sarkar la kahi padale nahi.
माझं असं मत आहे की जेवढे कोकण वासिय गाव ते मुंबई पुणे व इतर ठिकाणी आहेत त्यांनी पुढे येणाऱ्या सर्व निवड नुकांवर बहिष्कार घाला कोणीही मतदान करू नका असे ठरऊन करूया, कोणताही राजकारणी उमेदवार गाव ते मुंबई व इतर ठिकाणी दरवाजात आला की त्याला एकच सांगायचं पाहिला मुंबई गोवा महामार्गाचा काम पूर्ण कर आणि मग मत मागायला ये, कोणीही यांना गावाची सीमा ओलांडून गावात घेऊ नका हाकलून लावा ह्या भडव्यांना, माफ करा यांना मी भडवा हा शब्द वापरला आहे, कारण कुत्रा सुद्धा त्याचे काम इमाने इतबारे करतो.
Koknat jitke khasar, amdaar ahet Tyanna bhav Dena band Kara. Ek road Purna hot nahi ahe. Yanna kokani jante ne layki dakhvaichi vel Ali ahe