कोकणरत्न | संगीत दिग्दर्शक वसंत देसाई

कोकण गौरव – वसंत देसाई (जन्म : सोनावडे, सावंतवाडी, महाराष्ट्र, ९ जून, १९१२; – मुंबई, २२ डिसेंबर, १९७५) हे मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे.

घरात सांज-सकाळ होणाऱ्या आणि गाव देवळात होणाऱ्या भजन-कीर्तनांमुळे छोट्या वसंताला संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद स्यावे असे वाटू लागले. त्यासाठी त्यांणी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कशीत काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती; गोविंदराव टेंबे संगीत देत होते. वसंत देसाईंनी त्यांचा साहाय्यक होण्याचे पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना मास्तर कृष्णराव व केशवराव भोळे यादोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले.

इ.स. १९४३ मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ‘जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर]ांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती.

मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

वसंत देसाई यांनी संगीत दिग्दर्शन दिलेले चित्रपट

अमर भूपाळी (मराठी)

आशीर्वाद (हिंदी)

गुड्डी (हिंदी)

गूंज उठी शहनाई (हिंदी)

झनक झनक पायल बाजे (हिंदी)

दो आँखे बारा हाथ (हिंदी)

राम जोशी (मराठी)

शकुंतला (हिंदी)

 

वसंत देसाई यांची संगीत असलेली मराठी नाटके

गीता गाती ज्ञानेश्वर

जय जय गौरीशंकर

देव दीनाघरी धावला

पंडितराज जगन्‍नाथ

प्रीतिसंगम

शाबास बिरबल

देह देवाचे मंदिर

 

सन्मान आणि पुरस्कार 

सरकारी संगीत दिग्दर्शक, महाराष्ट्र राज्य

पद्मश्री पुरस्कार, १९७१

 

माहिती स्त्रोत : विकिपीडिया 

 

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search