Odisha Train Accident : बालासोर रेल्वे अपघात चौकशी प्रकरणी एक मोठी बातमी आहे. या प्रकरणात याआधी चौकशी करण्यात आलेला रेल्वेचा जुनियर इंजिनीअर आमीर खान अचानक कुटुंबासहित गायब झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आमीर खान याची याआधी अपघात प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती. मात्र त्यानंतर तो कामावर रुजू झाला नाही होता. संशय आल्याने सीबीआयने चौकशीसाठी पुन्हा तो ज्या भाड्याच्या घरात राहत होता ते घर गाठले असता तो फरार असल्याचे दिसून आले. त्याचा घराला कुलूप लावले होते. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तो आणि त्याचे कुटुंब अचानक गायब झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीबीआयने तो राहत असलेले घर सील करून त्यावर पाळत ठेवली आहे. सीबीआय फरार इंजिनीअर आमीर खान आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.
बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांनी आपला जीव गमावला होता तसेच बरेच प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात की घातपात याची चौकशी करण्यासाठी सीबीआयला पाचारण करण्यात आले होते.