Mansoon Alert : उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासीयांसाठी तसेच पेरणीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहाणार्या शेतकर्यांसाठी कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अशात चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे मान्सूनचा मार्ग मोकळा झाली आहे. यामुळे राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंबंधी माहिती दिली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंबंधी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलं की, ‘२३ जूनपासून कोकणातील काही भागांत, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर २४-२५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2023