Mumbai Goa Highway News :परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, मात्र या पावसातही हा घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत.
रत्नागिरी जिल्हय़ात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला होता. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी २४ जून रोजी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून गाडी चालवताना वाहकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
या धोक्याबरोबरच या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Vision Abroad