Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी शुक्रवारी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
वीर ते खेड विभागादरम्यान बुधवारी दु. १२.२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३.२० वाजता संपेल. या मेगाब्लॉकमुळे
६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची थिरूअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची थिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
७ जुलै रोजी सुटणारी १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रत्नागिरी – खेड विभागात १ तास ५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन केले आहे.
Vision Abroad