रत्नागिरी : लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण धबधब्यावरील पर्यटनास दोन महिने बंदी घालण्याचे आदेश तहसिलदार प्रमोद कदम यांनी दिले आहेत. मुचकुंदी धरण खोरनिनको हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. असंख्य पर्यटक पावसाळ्याच्या कालावधीत धरणावर आंघोळीसाठी येत असतात. पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा मानवनिर्मित सांडवा वेगाने वाहू लागला आहे. या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून अतिवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
हेही वाचा - Konkan Railway: महत्वाचे! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल.
खोरनिनको सोबत सवतकडा आणि प्रभानवल्ली या ठिकाणच्या धबधब्यावरसुद्धा प्रशासनाने बंदी घातली असल्याने असंख्य हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

![]()
Facebook Comments Box

