सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री ८ वाजून ५१ मिनीटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सह्याद्री पट्ट्यातील सांगेली सह माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मोठा आवाज होऊन जमीन हादरली.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी हा भूकंपाचाच प्रकार असल्याचे सांगितले. हा ३ रिस्टर स्केल चा हा भूकंप होता. मात्र, त्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे ते निश्चित झाले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली. हा भूकंप असल्याचे अधिकृत रित्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे
भूकंपाच्या अधिक माहितीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=gov.in.seismo.riseq हे ॲप डाऊनलोड करावे.
Facebook Comments Box
Vision Abroad