मुंबई :बारसु येथील प्रस्तावित रिफायनरीबाबत एक महत्वाची बातमी आहे. बारसु येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त समोर आले आहे . कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमीही प्रसिद्ध झाल्याचे समजते. याबाबत भारतातील सत्ताधारी पक्षाने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केले नसले तरी भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिष शेलार यांचे आरोप
कोकणात प्रस्तावित असणारी रिफायनरी पाकिस्तानात चालली आहे यासाठी आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाला या बाबत जबाबदार धरले आहे. गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरे नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?, असा आरोपच शेलार यांनी केला.
Facebook Comments Box
Vision Abroad