Mumbai Goa Highway : ”सिधी-सिंगरौली तसेच मुंबई गोवा महामार्ग रखडल्याने आपणास अपराधीपणा वाटतो, मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल” हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. ते बुधवारी राज्यसभेच्या कामकाजादरम्यान आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. या प्रश्नावर सभापती जगदीप धनखड यांनीही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. हसत हसत ते म्हणाले की, केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे नितीन गडकरी यांना फक्त सिधी-सिंगरौली या महामार्गाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वतःहून मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख केला आहे. ज्या प्रकारे त्यांनी उत्तर दिले त्यावरून त्यांची हतबलता दिसून आली आहे.
अपराधीपणा वाटतोय
मध्य प्रदेशचे भाजप खासदार अजय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर हसत गडकरी म्हणाले की, हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मलाही अपराधीपणा वाटतो. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल.
Vision Abroad