Konkan Railway News :कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन काल दिनांक ०२ ऑगस्ट रोजी कोंकण विकास समितीने रेल्वे राज्य मंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) यांच्याकडे काही महत्वाच्या मागण्यांसाठी निवेदन लेखी दिले आहे.
यातील एक मागणी म्हणजे ११००३/११००४ तुतारी एक्सप्रेसचे जुनाट डबे बदलून आधुनिक एलएचबी डबे Linke Hofmann Busch (LHB) वापरून ही गाडी चालवणे ही आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरामदायक व्हावा या हेतूने ही मागणी केली गेली आहे. या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार्या कोकणकन्या एक्सप्रेस , मांडवी एक्सप्रेस, दिवा- सावंतवाडी तसेच एलटीटी-मडगाव या गाड्या एलएचबी कोच सहित धावत आहेत.
का होत आहे ही मागणी?
अधिक सुरक्षित: एलएचबी डबे जर्मन तंत्रज्ञानाचे असून ते लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत.दोन ट्रेनची टक्कर जरी झाली किंवा रूळांवरून ट्रेन घसरली तरी या हलक्या डब्यांमुळे कमी जीवितहानी होते.
जलद प्रवास:हे डबे दर ताशी 130 कि.मी. वेगाने धावण्याच्या क्षमतेचे असतात. या कारणाने प्रवास जलद होतो
अधिक प्रवासी क्षमता :एलएचबी डबे पारंपारिक डब्यांपेक्षा 1.7 मीटरने लांब असल्याने त्यात जादा प्रवाशांना बसता येते.
मेन्टेनन्स कमी :रेल्वेच्या पारंपारिक डब्यांची दर 18 महिन्याला मेन्टेनन्स करावे लागते. तर नव्या एलएचबी डब्यांना दोन वर्षांतून एकदा मेन्टेनन्ससाठी कारखान्यात पाठवावे लागते.
आधुनिक तंत्रज्ञान :तसेच हे डबे नव्या थ्री फेज तंत्राचे असल्याने ‘हेड ऑन जनरेशन’साठी (ओएचईच्या वीजेवर डब्यातील वीज उपकरणे चालविणे ) अत्यंत योग्य असतात. आयसीएफचे जुने पारंपारिक कोच टू फेजचे असल्याने त्यात ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र वापरण्यासाठी सर्कीट बदल करावा लागतो. नव्या तंत्रज्ञानाच्या एलएचबी डब्यांसाठी हे ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र लागलीच वापरता येते.
अधिक आरामदायक :दोन्ही प्रकारच्या कोचची तुलना करता एलएचबी अधिक आरामदायक आहेत.
वरील सर्व बाबी लक्षात घेवून आम्ही ही मागणी करत असल्याचे कोंकण विकास समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या मागणी व्यतिरिक्त २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि ११०९९/१११०० लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना वैभववाडी रोड येथे थांबा देण्याची मागणी एका स्वतंत्र निवेदनात केली गेली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर व श्री. अक्षय मधुकर महापदी उपस्थित होते.
wp-1691038912309
wp-1691038868292
Vision Abroad