Mumbai : रत्नागिरीतील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर एक गंभीर आरोप केला आहे. बारसू आंदोलनासाठी बेंगळुरूतून फंडिग झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात बारसू आंदोलनाविषयी निवेदन सादर केले. यादरम्यान, त्यांनी बारसू प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी बेंगळुरूतून पैसा मिळाला आहे असा गंभीर आरोप फडणवीस यांनी विधानभवनात केला आहे. बारसू आंदोलनात तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला.
” ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं…”
बारसू (Barsu)रिफानरीला विरोध म्हणून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती असेही फडणवीस म्हणाले.
“माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात. यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बारसू आंदोलकांवरील लाठीचार्जचा आरोप फेटाळला…
पोलिसांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “बारसू आंदोलनात ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांच्याच गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत” असेही फडणवीस यांनी सांगितले.
Facebook Comments Box
Vision Abroad