
रत्नागिरी |कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित KRCL आणि सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्थानकांवरील कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने काल करण्यात आले.
खालील १२ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण :
✅रायगड जिल्हा- वीर, माणगाव आणि कोलाड
✅रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड
✅सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी
![]()


