आंबोली : जंगलात होणारे मानवीअतिक्रमण, अतिप्रमाणात होणारी वृक्षतोड आणि शिकारीमुळे अनेक वन्य प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रजाती तर समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र वनपरिसंस्थेचे महत्व जाणून त्याचे जाणून त्याचे रक्षण करणे, प्राणिमात्रांवर दया दाखवणे हे आपले आद्य कर्तव्य मानणारे अजूनही काही लोक आपणास कोकणात आढळून येत आहे. याची अनुभूती आज आंबोली येथे अनुभवण्यास मिळाली.
आंबोली फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते. त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच घर असणाऱ्या रानमाणूस” प्रथमेश गावडे याला लक्षात आल्यानंतर त्याने त्या पिल्लाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले.त्याच्यासोबत मग शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर हे देखील आले यानंतर त्यांनी आंबोली वन विभागाला कळवल्यानंतर बाळा गावडे आणि वनरक्षक श्री. गाडेकर यांनी त्या पिल्लाला आंबोली वनकार्यालयात नेले पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. हे पिल्लू साधारण अंदाजे वर्षभराचे आहे. कुत्र्यांच्या झुंडीत सापडल्याने पिल्लू भयभीत झाले होते. आईपासून दुरावलेले हे पिल्ले भरकटलेल्याने वाट चुकले आणि कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले; मात्र त्याचवेळी तेथे पोहोचलेले प्रथमेश गावडे यांच्यामुळे पिल्लास जीवदान मिळाले.
Facebook Comments Box
Vision Abroad