मुंबई :ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे.पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.
पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशननं लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टीट्युट यांच्यासह हर्षित पटेल आणि तेजस ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.

Facebook Comments Box