Vande Bharat Express : देशात वंदे भारत एक्सप्रेस ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या वाढल्याने आता तिकिटे मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता काही मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा विचार केला जात आहे.
प्रमुख भारतीय शहरांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेने गजबजलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी सेमी हाय-स्पीड ट्रेन सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या उल्लेखनीय यशानंतर, आता मुंबई-अहमदाबाद अशी नवी वंदे भारत एक्सप्रेस पुढील महिन्यापासून चालू करण्यात येणार असल्याची माहिती पाश्चिम रेल्वेने दिली आहे.
दररोज 30,000 पेक्षा जास्त प्रवासी मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावर अवलंबून आहेत, सध्या या मार्गावर सुमारे 24 गाड्या चालतात, ज्यात नियमित आणि साप्ताहिक सेवा समाविष्ट आहेत. दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे उद्दिष्ट ही गर्दीची अडचण दूर करणे आणि आरामदायक प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad