रायगड | २७ ऑगस्ट: मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली आहे. महामार्गावर पळस्पे फाटा येथून या यात्रेस सुरवात झाली आहे.
संपूर्ण कोकणात एकूण सात टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे. विविध टप्प्यात शालिनी ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, विनोद खोपकर, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर हे पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता कोलाड नाका येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने यात्रेची सांगता होईल.मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे आज मनसे रस्त्यावर उतरली आहे.
Konkan Hearted Girl म्हणून प्रसिद्ध असेलेली अंकिता प्रभू वालावलकर सुद्धा या यात्रेत अमित ठाकरे यांच्यासोबत सामील झाल्याचे दिसत आहे.
यात्रेत ‘यमराज’ सामील.
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कित्येक जणांनी आपले प्राण गमावले आहेत त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी यमराजाची वेशभूषा केलेला एक कार्यकर्ता सुद्धा या पदयात्रेत सामील झाला आहे.

Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: बाप्पा पावला! गणेशोत्सवात मुंबई-मडगाव वंदेभारत एक्सप्रेस होणार १६ डब्यांची
कोकण
"...अन्यथा प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी स्थानकावर रेल रोको आंदोलन..." कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा इशा...
कोकण
Mumbai Goa Highway: निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभिय...
महाराष्ट्र