मुंबई:वसई-विरार, मिरा- भायंदर तसेच बोरिवली आणि पश्चिम रेल्वे कक्षेत राहणाऱ्या कोकण वासियांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा आणि जवळचा रेल्वेमार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून पनवेलसाठी सोयीचा असलेल्या नायगाव आणि जूचंद्र दरम्यानच्या नवीन दुहेरी रेल्वे लाईनचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला रेल्वेबोर्डकडून मान्यता मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली येथून कोकण रेल्वेवर जाणाऱ्या नियमित गाड्या सुरु करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नायगाव – जूचंद्र कॉर्ड लाईन (जोड मार्गिका) चा प्रस्ताव रेल्वे कडे पाठविण्यात आला होता. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारात या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती मागवली होती. या महितीनुसार या प्रस्तावाला रेल्वे बोर्डने दिनांक २७ जुलै २०२३ रोजी मान्यता दिली असून या प्रकल्पाची अंदाजित रक्कम १७५.९९ कोटी इतकी ठरविण्यात आली आहे. जमिनी अधिग्रहण केल्यापासून ३ वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
सध्या उपरोक्त परिसरातील नागरिकांना कोकणाकडे जाण्याकरिता दादर किंवा कुर्ला स्थानकात जाऊन पुढची रेल्वे पकडावी लागते. गर्दीमुळे ते त्रासचे ठरते. म्हणून नायगाव आणि जूचंद्रदरम्यान नवीन दुहेरी रेल्वे लाईन टाकण्याची मागणी केली गेली होती, त्या मागणीला यश आले आहे. आता प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून करण्याची. त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. हा नवीन मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वे कक्षेत येणाऱ्या मुंबईतील नागरिकांना कोकणात जाण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कोकणात जाणाऱ्या काही गाड्या या मार्गावरून वळविण्यात येणे शक्य होणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले
कोकण
Konkan Railway: प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली ही गाडी आता एलएचबी स्वरूपात धावणार; स्लीपर डब्यांमध्येह...
कोकण
कोकण रेल्वेत चित्रित झालेला 'नवरा माझा नवसाचा-२' चित्रपट 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
ज्ञान आणि मनोरंजन