रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
मुंबई: गणेशचतुर्थीला कोकणात रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो रो सेवा स्थगित ठेवावी असे साकडे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांशिवाय अजूनपर्यंत ३१२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे स्थगित ठेवल्यास अजून गाड्या चालविण्यात येऊ शकतात. असे त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर ताण येणार आहे. या कालावधीत मालवाहतूक आणि रो रो सेवा चालविल्यास रेल्वेमार्गावर गाड्यांचा खोळंबा होणार आहे. अनेक गाड्या सिंग्नल साठी थांबवाव्या लागणार असून त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad