सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराच्या विकासासाठी येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कोकणची काशी कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पावले उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगडमध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पोद्दार स्कूल कणकवली मध्ये सुरू केले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे मोठे प्रकल्प पर्यटनच्या माध्यमातून आणणार आहे, असेही आमदार श्री. राणे यांनी पत्रकातून नमुद केले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad