Konkan Railway News: कोकण रेल्वेवरील वीर, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि पेडणे स्थानकांवरील मॅन्युअल कोटा आरक्षण प्रणाली (क्यूआरएस/QRS) बुकिंग काउंटर कोरोनानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना संबंधित स्थानकांवरून आरक्षित तिकिटांचे व्यवहार करता येत नाहीत. काही ठिकाणी पोस्टात आरक्षण केंद्रे आहेत, परंतु ते आरक्षण सुरु होणेच्या वेळेत (सकाळी ८ वाजता) सुरू होत नसल्यामुळे व काही वेळा योग्य इंटरनेट कनेक्शन अभावी बंद असल्यामुळे प्रवाशांना तोही पर्याय उपलब्ध नाही.
याचाच विचार करून जल फाउंडेशनने वरील स्थानकांतील अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) बुकिंग काउंटरचे यूटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) काउंटरमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आज मंगळवार दि. ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात देण्यात आले. याबाबतची माहिती जल फाउंडेशन (कोकण विभाग) चे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली आहे.
Vision Abroad